Thursday, December 8, 2011

गेले द्यायचे च राहून......

अखेरीस तो महिना उजाडला कि जेव्हा आपण अचानक nostalgic होतो....Yess  डिसेंबर महिना सुरु झाला कि उगाच आपण हळवे होतो . मनात एक टोचणी सुरु होते अजून एक वर्ष गेले कित्त्ती गोष्टी करायच्या ठरवले होते पण शर्थ काही च केले नाही अजून एक वर्ष वाया गेले.
पुन्हा पुन्हा आपण चालू वर्षाची काहीच पाने भरलेली diary  वाचू लागतो आणि
मग हिशोब करू लागतो अमुक गोष्ट या मूळे नाही होऊ शकली आणि दुसरी अन्य कुठल्या तरी गोष्टी मूळे... उगाच च मनाला समजावू लागतो पुढील वेळे पासून असले न झेपणारे संकल्प च करायचे नाहीत  सगळ्या गोष्टी का आपल्या हातात असतात का ? क्षणभर का होईना आपण आपल्याच मनाला दिलासा देतो कि आपण आपल्या परीने खूप प्रयत्न केला पण external factors वर   आपला काही च control नाही ना!!!
पण अशा पळवाटा काढण्या पेक्षा आपण आपली हार मुक्त मनाने कबूल केली तर ?? किती छान हलके वाटेल ना? किमान आपण आपल्या मनाशी प्रामाणिक राहिल्या च समाधान तरी पदरात पडेल...... मला अगदी ठाऊक आहे की आज च्या स्पर्धेच्या जगात आपण स्वतःशी सुद्धा हार पत्करू शकत नाही. पण मी काय म्हणतो जर नाही झाला एखादा संकल्प तर कुणी फाशी तर देणार नाही ना ?? फार फार तर पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील... आणि या वेळेला आपल्या कडे अधिक अनुभव आणि प्रगल्भता असेल... कशा मूळे आपले संकल्प पूर्ण होत नाहीत या गोष्टी जरी लक्षात आल्या तरी पुढील वर्षाचा संकल्प ५०% झाल्यात जमा होईल...पण नाही आपण उगाच स्वताला  च दोष देत अजून मौल्यवान दिवस वाया घालवतो....
चला एक गोष्ट मान्य करू की आपण एवढ्या मोठ्या मनाचे नाही की आपली हार मोकळ्या मनाने कबूल करू. पण किमान वर्ष भरात आपण किती गोष्टी ना ठरवता
succesfully  मिळवल्या किंवा आपण किती गोष्टी इतरांना देऊ शकलो याचा हिशोब नं केलेया गोष्टी पेक्षा अधिक सुखावणारा असेल पण नाही आपण मात्र अर्ध्या रिकाम्या ग्लासा च्या मागे धावत राहतो अर्धा भरलेला ग्लास कधी च पाहत नाही.....
आता हे २०११ चे वर्ष संपायला काही च दिवस उरले असताना काय घ्यायचे बाकी आहे या चा विचार करण्या पेक्षा काय द्यायचे बाकी यावर कृती करूयात कदाचित याने दुसर्याचे आणि पर्यायानी आपले हि आयुष्य अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होईल.
जाता जाता कुठेशी वाचलेल्या चार सुंदर ओळी  लिहाव्याश्या वाटत आहेत
सरत्या वर्षाला सांगा जे दिलेस त्याचे आभार....
येणाऱ्या वर्षाला माग सुख समृद्धी चा होकार..
चैतन्याने बहर विसरा सारे किंतु....
येणारे वर्षे म्हणेल तथास्तु !!! तथास्तु!!!......

 





    
 

    


  

No comments:

Post a Comment