Thursday, April 24, 2014

Old Wine... New Bottle

Old Wine... New Bottle
रात्री १०.१५ ला office मधून फोन आला अन एक urgent काम आल. काहीश्या अनिच्छेने laptop उघडला १०-१५ मिनिटामध्ये च काम संपल. म्हणल laptop उघडला आहेचे  तर ऐकावे छान काहीतरी. अश्या वैतागलेल्या वेळी आशा ताईंच्या सुरांसारख दुसर stress buster नाही. म्हणून  केला काय ऐकाव बर आणि अचानक ओळी आठवल्या  मी मज हरपून बसले ग…  मनात म्हणाल वा गबाले वा काय choice आहे!!! बस लगेच you tube वर search टाकला
आशा ताईंच्या गाण्या बरोबर च suggestion मध्ये time pass मधला ही scene आला. नकळत तोच पहिला open केला कारण तर माहित च आहे ना आपल्याला " नया हैं  वह " तर scene open झाला. गाण्याच्या ओळी scene मध्ये इतक्या सुंदर पणे synchronize झाल्या होत्या कि आह हा हा मजा आगया. एकदा , दोनदा , तीनदा scene पाहिला. सूर किती काही बोलून जातात हे भावलं अगदी खोलवर.
छान वाटत ना अस काही तरी छान वेगळ समोर आल की. गाण  जून पण संदर्भ नवा , मांडणी नवी . एका नव्या कलाकृती इतकीच माझ्या साठी ही कलाकृती ही तेवढीच सुरेख आणि अर्थपूर्ण आहे rather काहीशी अधिक अवघडच आहे.
पण काही लोकांना specially आपल्या कडच्या जुन्या खोडांना अस  जुन्या सोन्यात अशी ढवळाढवळ केलेली. पण मला एक कळत नाही यांची इच्छा असते की जून सोन  आपल्या  पर्यन्त  पोचाव पण  आपण  ते आपल्या पद्धतीने modify  केलेलं ही चालत नाही. लहान पणी आपल्याला कडू गोळी देताना वरून गोड वेष्टन हेच लोक द्यायचे ना ? तसच आहे ना या कलाकृतींच remix , म्हणा inspiration म्हणा अथवा remake... त्या कलाकृतीचा गाभा आपल्या पर्यंत पोचल्याशी मतलब आहे ना???
पण नाही ते ही गोष्ट मान्य करत नाहीत. बाकी नेते मंडळी नवीन मुलामे देऊन जुनीच आश्वासने देऊन जातात, आपआपले जुने जोडीदार पांढर्याचे काळे केस करून नवीन  होऊन आलेले चालतात, जुन्या गोधडीला नव पातळ लाऊन अधिक उबदार केलेलं चालत, पण ही मात्र काही या लोकांना पटत नाही. ते आपला मुद्दा सोडत नाहीत नी आपण आपला
पण एक सांगू हे असे काही गोड  पेच प्रसंग नाती अजून घट्ट करतात आणि मला ते तसच enjoy करायला आवडतात. तुम्ही ही  करून पहा बघा अजून मजा येईल.
सुरुवात या video ने करा
http://www.youtube.com/watch?v=gwDXcPAGcfI
वि सु : Time Pass सिनेमाचा scene  केवळ संदर्भ म्हणून होता त्या मागील हेतु या चित्रपटाची प्रसिद्धी करणे नव्हता हे वाचकांनी लक्षात घ्यावे… हा हा हा  just kidding
Take Care
अधीश