रविवार दुपारचे जेवण enjoy करत असतानाच एका unknown नंबर वरून फोन आला. काहीसा अनिच्छेने च फोन घेतला. पलीकडचा आवाज खूप उत्साह , आनंद आणि समाधाना ने भरलेला होता. तो हाय हलो काही न बोलता म्हणाला ," मी ईश्वर बोलतोय मी graduate झालो first क्लास मिळाला. पहिला फोन तुला केला तूं माझ्या मागे उभा राहिलास म्हणून हे सगळ झालं. " मन खटकन ३ वर्षे माग गेल... मुंबई मध्ये. माझ्या महिंद्राच्या ऑफिस मध्ये काम करणारा ऑफिस बॉय ईश्वर. मराठीच्या धड्यात किंवा कथेत शोभणारा. सावळा, हसरा चुणचुणीत , हजरजबाबी. ऑफिस कामा सोबत अंगीभूत उत्साहामुळे ऑफिस कामात ही लूडबूड करणारा. बऱ्याचदा त्याच्या अति उत्साहाने बॉस चा ओरडा खाणारा. मी एकदा मजेत म्हणल ,"एवढा उत्साह शिक्षणात का नाही दाखवलास ?" आणि मग काय एक दिवस गडी आला ना हातात evening college चा form घेऊन. मला म्हणला form भरून दे. मी दिला आणि तो निघून गेला. त्या क्षणी ही मला वाटल नव्हत हा पोरगा काही करेल म्हणून. पण पुन्हा आला ना काही दिवसांनी मला म्हणला माझ्या १२ वी च्या मार्कशीट चा घोळ आहे कॉलेज वाले ऐकत नाहीयेत तू येउन बोलतोस का ?? मला हसावं की रडावं कळेना तरी त्याच्या सोबत दोनदा कॉलेज ला गेलो तिथल्या लोकांशी बोललो. त्याच्या साठी थोडा वेळ मागून घेतला. १२ arts नंतर direct commerce ला admission मिळावी म्हणून ही बोललो. आणि पुढे त्याला admission मिळालीही. पण त्याच दरम्यान पुण्याला shift झालो आणि कालांतराने त्याचा विसर ही पडला.
त्या नंतर गड्यानी direct फोन केला तो कालच. तो ही graduate होऊन. मला म्हणला कुठला क्लास नाही लावला फक्त कोलेज करून पास झालो. आणि तीनही वर्ष वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलो. त्या वेळेस कुणी माझ्या सोबत उभ राहील नाही फक्त तू होतास म्हणून हा दिवस आला. आता तो MBA करायचा plan करतोय, ऑफिस बॉय ची नोकरी सोडून clerk किंवा admin ची नोकरी मिळवायचा प्रयत्न करतोय.
मला मराठीच्या पाठ्य पुस्तकातला धडा आठवला ज्यात लेखक त्याच्या घरी पेपर टाकणाऱ्या मुलाला मदत करतो आणि पुढे त्याच मुलाला बक्षीस द्यायची संधी त्याला मिळते. तेव्हा वाटल होत, की हा धडा काल्पनिक असेल. पण आज वाटतंय real आयुष्यातही अश्या गोष्टी खरच घडतात. कालचा सगळा दिवस या एका वेगळ्याच आनंदात गेला. कुणासाठी केलेलं चांगल कधीही वाया जात नाही याचा प्रत्यय आला.
खूप वेगळी भारी आणि कमाल अवर्णनीय घटना आहे ही… I wish तुमच्याही आयुष्यात घडावी कारण त्याच समाधान एक वेगळ्या level च असत आणि आता मी ते खात्रीने सांगू शकतो.
Thank you ईश्वर for this wonderful moment. god bless you and I am proud of you.

No comments:
Post a Comment