Wednesday, August 19, 2015

काल हवा येऊ दया चा एपिसोड कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला. सगळ्यांनी त्याच कौतुकही केल. पण मला सगळ्यात जास्त कौतुक वाटलं ते नि च्या कार्यकर्त्यांच किती clear आणि माफक अपेक्षा होती त्यांची, दाभोळकर गेले तरी त्याचं कार्य तसच पुढ चालत राहायला हवएवढ्या एकाच ध्येयाने भारलेले ते सारे दिसत होते. एका दाभोळकरांची पोकळी भरून काढण्या साठी जेव्हा एवढे कार्यकर्ते तनमन झोकून देतात ना तेव्हाच खर्या अर्थाने समाज सुधारकाच काम यशस्वी होत. मारेकार्यांनी काही गोळ्या घालून दाभोळकरांना मारलं पण त्याचं प्रतीउत्तरा साठी आज इतके नवे दाभोळकर उभे राहिले बस अजून काय हव ??? मला वाटत समाजा साठी झटणाऱ्या प्रत्येकच सुधारकाची केवळ एवढीच अपेक्षा असावी की त्याच्या नंतर त्याच कार्य तितक्याच जोमाने सुरु रहाव. त्याला अपेक्षा नसते विशेष सुट्टी ची , मिरवणुकीची, मोठमोठाल्या banners की मोठमोठ्या घोषणांची. कुठेतरी हा विचारही झिरपायला हवा आणि योग्य विचार अन कृती घेऊन किमान एक जणाने तरी तो लढा पुढे घेऊन जावा, समाजसुधारक भरून पावतील.

No comments:

Post a Comment