काल हवा येऊ
दया चा एपिसोड
कार्यक्रमाला वेगळ्याच उंचीवर घेऊन
गेला. सगळ्यांनी त्याच
कौतुकही केल. पण
मला सगळ्यात जास्त
कौतुक वाटलं ते
अ नि स
च्या कार्यकर्त्यांच किती
clear आणि माफक अपेक्षा
होती त्यांची, दाभोळकर
गेले तरी त्याचं
कार्य तसच पुढ
चालत राहायला हव.
एवढ्या एकाच ध्येयाने
भारलेले ते सारे
दिसत होते. एका
दाभोळकरांची पोकळी भरून काढण्या
साठी जेव्हा एवढे
कार्यकर्ते तनमन झोकून
देतात ना तेव्हाच
खर्या अर्थाने समाज
सुधारकाच काम यशस्वी
होत. मारेकार्यांनी काही
गोळ्या घालून दाभोळकरांना मारलं
पण त्याचं प्रतीउत्तरा
साठी आज इतके
नवे दाभोळकर उभे
राहिले बस अजून
काय हव ??? मला
वाटत समाजा साठी
झटणाऱ्या प्रत्येकच सुधारकाची केवळ
एवढीच अपेक्षा असावी
की त्याच्या नंतर
त्याच कार्य तितक्याच
जोमाने सुरु रहाव.
त्याला अपेक्षा नसते विशेष
सुट्टी ची , मिरवणुकीची,
मोठमोठाल्या banners की मोठमोठ्या
घोषणांची. कुठेतरी हा विचारही
झिरपायला हवा आणि
योग्य विचार अन
कृती घेऊन किमान
एक जणाने तरी
तो लढा पुढे
घेऊन जावा, समाजसुधारक
भरून पावतील.
Baatein Kuch Anakhesee
Wednesday, August 19, 2015
Sunday, August 9, 2015
रविवार दुपारचे जेवण enjoy करत असतानाच एका unknown नंबर वरून फोन आला. काहीसा अनिच्छेने च फोन घेतला. पलीकडचा आवाज खूप उत्साह , आनंद आणि समाधाना ने भरलेला होता. तो हाय हलो काही न बोलता म्हणाला ," मी ईश्वर बोलतोय मी graduate झालो first क्लास मिळाला. पहिला फोन तुला केला तूं माझ्या मागे उभा राहिलास म्हणून हे सगळ झालं. " मन खटकन ३ वर्षे माग गेल... मुंबई मध्ये. माझ्या महिंद्राच्या ऑफिस मध्ये काम करणारा ऑफिस बॉय ईश्वर. मराठीच्या धड्यात किंवा कथेत शोभणारा. सावळा, हसरा चुणचुणीत , हजरजबाबी. ऑफिस कामा सोबत अंगीभूत उत्साहामुळे ऑफिस कामात ही लूडबूड करणारा. बऱ्याचदा त्याच्या अति उत्साहाने बॉस चा ओरडा खाणारा. मी एकदा मजेत म्हणल ,"एवढा उत्साह शिक्षणात का नाही दाखवलास ?" आणि मग काय एक दिवस गडी आला ना हातात evening college चा form घेऊन. मला म्हणला form भरून दे. मी दिला आणि तो निघून गेला. त्या क्षणी ही मला वाटल नव्हत हा पोरगा काही करेल म्हणून. पण पुन्हा आला ना काही दिवसांनी मला म्हणला माझ्या १२ वी च्या मार्कशीट चा घोळ आहे कॉलेज वाले ऐकत नाहीयेत तू येउन बोलतोस का ?? मला हसावं की रडावं कळेना तरी त्याच्या सोबत दोनदा कॉलेज ला गेलो तिथल्या लोकांशी बोललो. त्याच्या साठी थोडा वेळ मागून घेतला. १२ arts नंतर direct commerce ला admission मिळावी म्हणून ही बोललो. आणि पुढे त्याला admission मिळालीही. पण त्याच दरम्यान पुण्याला shift झालो आणि कालांतराने त्याचा विसर ही पडला.
त्या नंतर गड्यानी direct फोन केला तो कालच. तो ही graduate होऊन. मला म्हणला कुठला क्लास नाही लावला फक्त कोलेज करून पास झालो. आणि तीनही वर्ष वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलो. त्या वेळेस कुणी माझ्या सोबत उभ राहील नाही फक्त तू होतास म्हणून हा दिवस आला. आता तो MBA करायचा plan करतोय, ऑफिस बॉय ची नोकरी सोडून clerk किंवा admin ची नोकरी मिळवायचा प्रयत्न करतोय.
मला मराठीच्या पाठ्य पुस्तकातला धडा आठवला ज्यात लेखक त्याच्या घरी पेपर टाकणाऱ्या मुलाला मदत करतो आणि पुढे त्याच मुलाला बक्षीस द्यायची संधी त्याला मिळते. तेव्हा वाटल होत, की हा धडा काल्पनिक असेल. पण आज वाटतंय real आयुष्यातही अश्या गोष्टी खरच घडतात. कालचा सगळा दिवस या एका वेगळ्याच आनंदात गेला. कुणासाठी केलेलं चांगल कधीही वाया जात नाही याचा प्रत्यय आला.
खूप वेगळी भारी आणि कमाल अवर्णनीय घटना आहे ही… I wish तुमच्याही आयुष्यात घडावी कारण त्याच समाधान एक वेगळ्या level च असत आणि आता मी ते खात्रीने सांगू शकतो.
Thank you ईश्वर for this wonderful moment. god bless you and I am proud of you.

Thursday, April 24, 2014
Old Wine... New Bottle
Old Wine... New Bottle
रात्री १०.१५ ला office मधून फोन आला अन एक urgent काम आल. काहीश्या अनिच्छेने laptop उघडला १०-१५ मिनिटामध्ये च काम संपल. म्हणल laptop उघडला आहेचे तर ऐकावे छान काहीतरी. अश्या वैतागलेल्या वेळी आशा ताईंच्या सुरांसारख दुसर stress buster नाही. म्हणून केला काय ऐकाव बर आणि अचानक ओळी आठवल्या मी मज हरपून बसले ग… मनात म्हणाल वा गबाले वा काय choice आहे!!! बस लगेच you tube वर search टाकला
आशा ताईंच्या गाण्या बरोबर च suggestion मध्ये time pass मधला ही scene आला. नकळत तोच पहिला open केला कारण तर माहित च आहे ना आपल्याला " नया हैं वह " तर scene open झाला. गाण्याच्या ओळी scene मध्ये इतक्या सुंदर पणे synchronize झाल्या होत्या कि आह हा हा मजा आगया. एकदा , दोनदा , तीनदा scene पाहिला. सूर किती काही बोलून जातात हे भावलं अगदी खोलवर.
छान वाटत ना अस काही तरी छान वेगळ समोर आल की. गाण जून पण संदर्भ नवा , मांडणी नवी . एका नव्या कलाकृती इतकीच माझ्या साठी ही कलाकृती ही तेवढीच सुरेख आणि अर्थपूर्ण आहे rather काहीशी अधिक अवघडच आहे.
पण काही लोकांना specially आपल्या कडच्या जुन्या खोडांना अस जुन्या सोन्यात अशी ढवळाढवळ केलेली. पण मला एक कळत नाही यांची इच्छा असते की जून सोन आपल्या पर्यन्त पोचाव पण आपण ते आपल्या पद्धतीने modify केलेलं ही चालत नाही. लहान पणी आपल्याला कडू गोळी देताना वरून गोड वेष्टन हेच लोक द्यायचे ना ? तसच आहे ना या कलाकृतींच remix , म्हणा inspiration म्हणा अथवा remake... त्या कलाकृतीचा गाभा आपल्या पर्यंत पोचल्याशी मतलब आहे ना???
पण नाही ते ही गोष्ट मान्य करत नाहीत. बाकी नेते मंडळी नवीन मुलामे देऊन जुनीच आश्वासने देऊन जातात, आपआपले जुने जोडीदार पांढर्याचे काळे केस करून नवीन होऊन आलेले चालतात, जुन्या गोधडीला नव पातळ लाऊन अधिक उबदार केलेलं चालत, पण ही मात्र काही या लोकांना पटत नाही. ते आपला मुद्दा सोडत नाहीत नी आपण आपला
पण एक सांगू हे असे काही गोड पेच प्रसंग नाती अजून घट्ट करतात आणि मला ते तसच enjoy करायला आवडतात. तुम्ही ही करून पहा बघा अजून मजा येईल.
सुरुवात या video ने करा
http://www.youtube.com/watch?v=gwDXcPAGcfI
वि सु : Time Pass सिनेमाचा scene केवळ संदर्भ म्हणून होता त्या मागील हेतु या चित्रपटाची प्रसिद्धी करणे नव्हता हे वाचकांनी लक्षात घ्यावे… हा हा हा just kidding
Take Care
अधीश

Saturday, December 1, 2012
गोडी अपूर्णतेची लावेल ओढ जीवा....
गोडी अपूर्णतेची लावेल ओढ जीवा....
काळाच चक्र पुन्हा फिरून त्याच बिंदूवर येते आणि पुन्हा अस्वस्थ करणारा डिसेंबर महिना उजाडतो. पूर्ण न झालेल्या संकल्पांचे पाहुणे आगंतुका प्रमाणे मनात प्रवेश करतात आणि अस्वस्थ जाणिवांचा धुमाकूळ मनात सुरु होतो. इतके दिवस न दिसणारे नवे च राहिलेले न वापरलेलं jooging shoes दृष्टीस पडू लागतात, धूळ खात पडलेल trade mill जाता येता खिजावायाला लागत, अचानक आराष्यामध्ये वाढलेलं पोट दिसू लागत , न लिहिली गेलेली डायरीची पाने जांभई देत आपल्या ला खुणावू लागतात, खोट न बोलण्याचा संकल्प करणार्याना तर वर्ष्बर बोललेली खोटी विधाने दिवस रात्र कानी घुमू लागतात.
सांगायचा मुद्दा म्हणजे आपण पूर्ण न केलेल्या अनेक संकल्पाचे कर्ण पिशाच्च आपल्याला छळू लागतात आणि या सार्यांचा एक विचित्र असा ताण मनावर येतो. अशा वेळेस मनात विचार येतो कि दरवर्षी अपूर्र्ण च राहणार असतील तर हे संकल्प करावे तरी का ? जर संकल्पाच्या शेवटी अपूर्णतेच च दुख्ख च भोगायचं असेल तर मग संकल्प च का करावे.
पण खर बघायला गेल तर ही अपूर्णता, ही अस्वस्थ भावना च आपल सदैव गतिमान ठेवते. जसे रामदास म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे ? जर का कुणी अश्या रीतीने सर्वस्वी सुखी झाला असता तर जगण्या मागच या धावण्या मागच सार प्रयोजन च संपल असत ना??
वास्तविकत: नवीन वर्ष नवीन वर्ष अस तरी काय वेगळ असत ? नेहमीच्या दिवसा सारखा दिवस अन नेहमी सारखीच रात्र पण त्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन नवा असतो. त्या द्वारे नवीन जुन्या राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा करण्याचा उत्साह नवा असतो. नवीन वर्षात आपण पुन्हा सर्व काही नव्याने करतो, नवी उर्जा नवी आशा मनात साठवतो. आपल्या पूर्वजांनी काल गणनेच्या रूक्ष कामाला मानवी आयुष्याच्या सुख दुखाचे आशा अपेक्षांचे किती सुरेख कंगोरे दिले आहेत नां ?
मग काय आता क्षणभर थांबून आढावा घेऊयात या वर्षातले कोणते संकल्प पुढे carry forward करायचे आणि कुठले कायमचे fullstop. जितके अपूर्ण संकल्प जास्त तितके जगण्याला अर्थ जास्त...... एका गाण्यात किती सुरेख लिहल आहे ना गोडी अपूर्णतेची लावेल ओढ जीवा

Tuesday, September 4, 2012
क्षणभर माणूसकी.....
रविवारचा दिवस म्हणजे हॉटेल रुपी पंढरी खवय्यांच्या वारीने दुथडी भरून वाहू लागते.आणि वारी प्रमाणे इथेही निरनिराळे चांगले वाईट अनुभव येतात.कालचा अनुभव अगदी त्यातलाच एक.काल सहकुटुंब सहपरिवार हॉटेल मध्ये गेलो होतो,शेजारच्या टेबल वर एक तिशीतील जोडपे बरोबर एक साधारण दीड ते दोन वर्षाची मुलगी आणि काही इतर मित्रमंडळी जेवत होती. मुलीच्या हातात दोन तीन फुगे एकत्र बांधलेले खेळणे होते. ती तिच्याशी खेळत होती आणि आई वडील मित्रमंडळीशी गप्पा मारत होते.आपल्याकडे कुणी लक्ष देत नाही हे पाहून मुलीने भोकाड पसरले.हातातला फुगा आईच्या चेहऱ्यावर मारू लागली.आईने वैतागून पोरीला बापाकडे दिले.पण त्यालाही पोरीपेक्षा गप्पा आणि खाण्यातच अधिक रस होता.अखेरीस पोरीला कुणी घ्यायचे यावरून त्यांच्यात वाद सुरु झाला.तोच तिथला manager त्यांच्या मदतीला धावला.त्याने मुलीला कडेवर घेतले आणि कोपरयातील फिश tank मधील मासे तिला दाखवू लागला.इकडे आई वडील पुन्हा गप्पामध्ये मशगुल झाले.इकडे manager मात्र आपल्या कस्टमर ला काहीही त्रास होवू नये म्हणून पोरीला अगदी छान खेळवत होता. खेळताना ती फुगा तोंडात तर घालत नाहीये न याची खबरदारी घेत होता.मधेच जसे त्याला इतर टेबल वर ओर्डेर येत होत्या तसा तो एका वेटर ला त्या मुलीला द्यायचा आणि पुन्हा येऊन तिच्या शी खेळायचा. जवळ जवळ अर्धा तास हा सगळा कार्यक्रम चालला.इकडे आई बाबांचं यथेछ्च जेवण झाल्यावर त्यांना त्यांच्या लाडक्या लेकीची आठवण झाली.वडिलांनी अगदी लहान मुलाने आपले खेळणे दुसर्याने घेतल्यावर ओढून घ्यावे. तसे त्या मुलीला ओढून घेतले.आणि thanks तर सोडाच पण किमान हसून देखील त्याने त्याचे आभार मानले नाहीत. पुढे जाताना वारंवार ती मुलगी त्या manegar कडे पाहून वडिलांना खुणावत होती. पण त्यांनी तिच्याकडे तिळभर ही लक्ष दिले नाही आणि तो निघून गेला. Manager चा चेहरा क्षणभर आर्त झाला परंतु त्याने स्वत:ला आवरत तिथून पाय काढला.
का वागतो आपण या लोकांशी असे? ती माणसे नाहीत?त्यांना त्यांच्या भावना, अभिमान नाही? केवळ ते आपली सेवा करतात म्हणून त्यांना वाट्टेल तसे वागवाण्याचा अधिकार आपल्याला आहे का?एका अर्थाने अन्नदाते असलेले हे लोक आणि आपण कसे वागवतो त्यांना ? टेबल साफ करणारी पोरे पहिली कि त्यांच्या प्रमाणे आपल्या घरातील मुले का आठवत नाहीत आपल्याला ? आपण आपल्या घरातील मुलांना एवढे कामा ला लावतो तरी का ? मग या मुलाकडून मोठ्यासारख काम मिळण्याची अपेक्षा का करतो? परिस्थिती माणसाला अशी कामे करण्यास भाग पाडते म्हणून आपण त्यांना अपमानास्पद वागणूक द्यायची हा कुठला न्याय आहे ? जर ही माणसे नसती तर आपल्याला आज काल चे हे SO CALLED LUXURIOUS LIFE कसे मिळाले असते?
नाण्याची आपल्याला सोयीस्कर ती बाजू पहायची सवय झाली आहे आपल्याला. कधी तरी माणसाकडे कुठले ही लेबल न लावता माणूस म्हणून पाहूयात आयुष्य सुंदर आहे ते अधिक सुंदर होईल असे वाटत नाही का? या blog नंतर किमान एका हॉटेल मधल्या वेटर किंवा maneger वा टेबल पुसणाऱ्या मुलाकडे पाहून केवळ छान अंत:करणाने हसलात तरी माझे लिहिण्याचे प्रयोजन कामी आले असे मी समजेन आणि मला खात्री आहे तुम्हे ते नक्की पूर्ण कराल. चला पुन्हा भेट पुढच्या blog मध्ये लहान तोंडी मोठा घास घेतला असे वाटत असेल तर माफ करा.
अधिश
Friday, July 20, 2012
श्रावण मुंबईतला.....
लहानपणापासून श्रावण म्हणल की मनात न काळात श्रावणमासी हर्ष मानसी या बालकवींच्या ओळी येतात. पण आपल्या मुंबापुरीत जिथे सर्वत्र गर्दी, धांदल आणि धावणाऱ्या विवंचनांची हिरवळ आहे तिथे बालकवींच्या कवितेतातला श्रावण कसा सापडावा ??. पण याचा अर्थ असा नाही कि श्रावणाच सौंदर्य मुंबई मध्ये मिळत नाही. जसा आज सकाळी श्रावण अवचित भेटला मला म्हणाला मुंबई मध्ये पहिल्यांदाच भेटतोय आपण ये तुला मुंबईच्या एका अनोख्या रूपाची सफर घडवतो. मग काय दादर च्या चाळीतल्या बाल्कनी मध्ये उभा राहिलो आणि माझी मुंबई श्रावण सहल सुरु झाली
कसलं भारी आहे ना हा श्रावण ज्याला हात लावेल ते फक्त सुंदर आणि सुंदर च दिसायला लागत. रोजचा गर्दी नि गाड्यांनी भरलेला रस्ता आज एकदम मस्त काळा कुळकुळीत झाला होता, न चिखल न चिकचिक फक्त ओलसर काळा रस्ता धुतलेल्या काळ्या करावन्दासारखा ताजा तवाना वाटला मला. समोरच्या चाळीची कौले मगाशी पडलेल्या श्रावण सरींनी भिजली होती आणि आत्ता क्षणात पडलेल्या ऊन्हामुळे छान चमकत होती. पान्हाळीवर अडकलेले पाण्याचे थेंब तर हिऱ्याप्रमाणे चमकत होते. मला अचानक खूप भारी वाटायला लागल होत.
मनाला आवर घालून ऑफिसला जायला निघालो अन अचानक पुन्हा श्रावणाची सर आली. बाहेर माझ्याप्रमाणे ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांची एकच पंचाईत झाली. आडोश्याला जाऊन छत्री, रेनकोट काढे पर्यंत पाउस थांबला देखील आणि मस्त चमचमणार उन्ह पडल. अनेकांनी पाउसाला यथेछ शिव्या घातल्या. त्यांच्या मनातले संवाद चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. कारण मुंबईच्या लोकांना पाउस म्हणाल कि 26 जुलै ची काळी रात्र च दिसते ते या लोकाना हा श्रावण त्याच्या सरी कशा दिसणार ? असो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याच जळत त्यालाच कळत. पण मी मात्र हे सगळ enjoy करत होतो. रस्त्यातून निरनिराळ्या छत्र्यांची नक्षीदार फुल उमलली होती. कुणी एकाच छत्रीतून दोघे जण जात जात Officially Romanace करत होती.
कधी नव्हे तर आज ट्रेन मधेही उकडणारा घामाचा, अथवा झोडपणाऱ्या पाउसाचा स्पर्श नव्हता. होता फक्त श्रावणाच्या थंड सरींचा थंडावा. क्षणभरासाठी आपण दार्जीलिंगच्या च ट्रेन मधे आहोत कि काय अस वाटल. श्रावाणानी माझ्या दृष्टीलाच स्पर्श केला होता त्यामूळे ज्या गोष्टीकडे पाहत होतो ती प्रत्येक गोष्ट च सुंदर दिसत होती.
संध्याकाळ झाली तशी श्रावणाचा सरी थांबल्या तसं सगळ तेज सार सौंदर्य च लोपल ट्रेन चा संप, त्यामुळे होणारी परवड पुन्हा चित्र जैसे थे... मुंबई च सौंदर्य ही श्रावणसरी सारखाच तर आहे ना..क्षणांत येते सरसर हिरवे क्षणात फिरुनी उन्ह पडे......

Wednesday, May 23, 2012
तुमसे मिलकर.....ऐसा लगा तुमसे मिलकर.....
नेहमी प्रमाणे संध्याकाळी शिवाजी पार्क ला चक्कर मारायला बाहेर पडलो. कानात हेडफोन वर रेडियो चालू होता RJ मस्त मस्त बोलत होते एकसे एक गाणी चालू होती. थोडक्यात माझा नित्य क्रम चालू होता. चालता चालता अचानक वीज चमकावी तसा माझा मूड अचानक बदलला. अचानक खूप विचित्र आणि घुसमटायला लागलं. तसा मी मोकळ्या हवेवर फिरत होतो तरी खूप अस्वस्थ झालो होतो. कानात इतका वेळ आनंद देणार म्युझिक अचानक टोचर वाटू लागलं. क्षणात कानातून हेडफोन काढले आणि जवळच्या बाकावर बसलो. जरा स्वस्थ बसलो. थोडा श्वास शांत झाला तसे मला जरा ठीक वाटू लागलं तरी पूर्ण बरे वाटत नव्हत. वाटल मला काही तरी बोलायचं आहे पण काय ?कुणाशी? काहीही कळत नव्हत. पटकन मोबाईल हातात घेतला आणि म्हणाल आईशी बोलाव फोन लावला तोच वाटल उगाच तिला हे सगळ सांगितलं आणि ती तिकडे काळजी करायला लागली तर.... म्हणून बोलायच्या आतच फोन कट केला. मग विचार आला अरे मग मित्र कधी कामी येणार म्हणून झरझर मित्रांना फोन लावले आश्चर्य म्हणजे कुणी हि फोन उचलला नाही. एकाचा लागला तर तो एका पार्टी मध्ये होता मनात म्हणल च्यायला तो तिकडे मजा करायला गेलाय आणि मी काय सांगू त्याला की मला काही तरी अस्वस्थ होतंय काही तरी बोलायचं आहे पण काय ते कळत नाहीये अस काही तरी बोलून त्याचा पार्टी मूड spoil करण्या पेक्षा फोन ठेवला. वाटल एखादी girlfriend तरी हवी होती किमान तिला तरी सांगत आल असत. पण आत्ता जर तर च्या गोष्टी करून काही उपयोग नव्हता.
शेवटी काय मला काहीतरी होतंय काहीतरी बोलावस वाटतंय याच उत्तर माझ मलाच शोधायला लागणार आहे. मुंबई मध्ये या आधी कधीच मला अस झाल नव्हत. शेवटी मी मनात म्हणाले हे मुंबई माते तूच यातून रस्ता दाखव. आणि तिने तो दाखवला मला डोळ्या समोर एक छोटासा रस्ता आत जाताना दिसला अचानक पाउले तिकडे वळली. तो रस्ता थेट दादर च्या समुद्र कडे जात होता. Hardly २ मिनिटे चाललो आणि समुद्रावर आलो आणि सुदैवाने कुठल्याही प्रेमी युगुलांनी आसरा न घेतलेला एक दगड मला दिसला त्यावर जाऊन बसलो. समोर काळोख पसरला होता. समुद्राच्या भरतीची वेळ होती लाटा एकामागून एक उसळत होत्या. समोरच bandra -worli sea link ची कमान दिव्यांनी उजळून गेली होती. समुद्राच्या लाटा एका मागून एक पुढचा टप्पा गाठत होत्या. मनात विचार आला हा समुद्र गेली कित्तेक वर्ष इथेच आहे त्याच्या आजू बाजुच जग किती बदलत राहत तरी तो आहे तसाच तटस्थ त्याच कार्य करत तिथेच आहे. मनात विचार आला मला जमेल का असे स्वतच्या तत्वांशी, स्वप्नांशी, अस्तित्वाशी तटस्थ राहाण. आयुष्य कस असावं समुद्रा सारख आपल्या उद्देशाशी तटस्थ कि आजूबाजूच्या जागा सारख वेळेनुसार, गरजेनुसार बदलणार.
चेहऱ्यावर अचानक पाण्याचे तुषार उडले लाट अजून जवळ आली होती. ओहोटीच्या वेळेला अगदी दूर शांत दिसणारी लाट भरतीच्या वेळेला आपल्या जवळ येऊन तिच्या अस्तित्वाने आनंद देते.किंवा सुनामी च्या वेळेला समोरच्याचा थरकाप उडवून देते. केवळ सातत्याच्या प्रयत्नांनी एक न एक दिवस जग तुमची दाखल घेतच न यार.....
कसलं भारी आणि हलक वाटतंय आता मला अस्वस्थता नाही की अशांतता नाही. मला जे बोलायचं होते ते हेच आणि ते दुसर्या कुणाशी नाही माझ्याशीच. पण सरळ कळेल तर आयुष्य काय? आणि जर का ते इतक्या सहज काळाल असत तर कायमच लक्षात थोडाच राहील असत. आता मी बोलतोय माझ्याशीच अगदी विवेकानादानी सांगितल्या प्रमाणे जगातील सर्वात उत्तम माणसाशी म्हणजे माझ्या स्वताशीच बोलतोय. मी का आलोय इकडे? काय करायचं मला ? मला जे मिळवायचं आहे त्याच्या साठी प्रयत्न करतोय का मी ? करत असलो तर किती सातत्य आहे त्यात ?तितके प्रयत्न sufficient आहेत का? मी प्रश्न विचारात होतो आणि कुठलाही आडपडदा न ठेवता उत्तरे देत होतो. प्रत्येक उत्तरागणिक मला स्वताला खूप भारी वाटत होते. स्वताला appreciate करण्यात, cricise करण्यात इतकाच काय confess करण्यात जे काही सुख असत ना ते षड्ब्दात मांडता न येण्यासारखं असत. असा मस्त प्रश्नौत्तारांचा तास मी केला.
आता मी समुद्रा कडे पात फिरवून शांत मनाने चालतोय. कारण मला जे बोलायचं होतो ते मी बोललो होतो त्याची उत्तरे ही मला मिळाली होती कारण कुणी तिसरा येऊन माझ आयुष्य सुंदर करणार नाही हे मला पक्क कळून चुकलंय So अचानक काही तरी खजिना सापडावा अशा आनंदात मी घरी चाललो आहे. आनंद तर होणार च न जगातल्या सगळ्यात भारी माणसाला भेटून चाललो होतो ना.....
Subscribe to:
Posts (Atom)