गोडी अपूर्णतेची लावेल ओढ जीवा....
काळाच चक्र पुन्हा फिरून त्याच बिंदूवर येते आणि पुन्हा अस्वस्थ करणारा डिसेंबर महिना उजाडतो. पूर्ण न झालेल्या संकल्पांचे पाहुणे आगंतुका प्रमाणे मनात प्रवेश करतात आणि अस्वस्थ जाणिवांचा धुमाकूळ मनात सुरु होतो. इतके दिवस न दिसणारे नवे च राहिलेले न वापरलेलं jooging shoes दृष्टीस पडू लागतात, धूळ खात पडलेल trade mill जाता येता खिजावायाला लागत, अचानक आराष्यामध्ये वाढलेलं पोट दिसू लागत , न लिहिली गेलेली डायरीची पाने जांभई देत आपल्या ला खुणावू लागतात, खोट न बोलण्याचा संकल्प करणार्याना तर वर्ष्बर बोललेली खोटी विधाने दिवस रात्र कानी घुमू लागतात.
सांगायचा मुद्दा म्हणजे आपण पूर्ण न केलेल्या अनेक संकल्पाचे कर्ण पिशाच्च आपल्याला छळू लागतात आणि या सार्यांचा एक विचित्र असा ताण मनावर येतो. अशा वेळेस मनात विचार येतो कि दरवर्षी अपूर्र्ण च राहणार असतील तर हे संकल्प करावे तरी का ? जर संकल्पाच्या शेवटी अपूर्णतेच च दुख्ख च भोगायचं असेल तर मग संकल्प च का करावे.
पण खर बघायला गेल तर ही अपूर्णता, ही अस्वस्थ भावना च आपल सदैव गतिमान ठेवते. जसे रामदास म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे ? जर का कुणी अश्या रीतीने सर्वस्वी सुखी झाला असता तर जगण्या मागच या धावण्या मागच सार प्रयोजन च संपल असत ना??
वास्तविकत: नवीन वर्ष नवीन वर्ष अस तरी काय वेगळ असत ? नेहमीच्या दिवसा सारखा दिवस अन नेहमी सारखीच रात्र पण त्या कडे पाहण्याचा दृष्टीकोन नवा असतो. त्या द्वारे नवीन जुन्या राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा करण्याचा उत्साह नवा असतो. नवीन वर्षात आपण पुन्हा सर्व काही नव्याने करतो, नवी उर्जा नवी आशा मनात साठवतो. आपल्या पूर्वजांनी काल गणनेच्या रूक्ष कामाला मानवी आयुष्याच्या सुख दुखाचे आशा अपेक्षांचे किती सुरेख कंगोरे दिले आहेत नां ?
मग काय आता क्षणभर थांबून आढावा घेऊयात या वर्षातले कोणते संकल्प पुढे carry forward करायचे आणि कुठले कायमचे fullstop. जितके अपूर्ण संकल्प जास्त तितके जगण्याला अर्थ जास्त...... एका गाण्यात किती सुरेख लिहल आहे ना गोडी अपूर्णतेची लावेल ओढ जीवा