रविवारचा दिवस म्हणजे हॉटेल रुपी पंढरी खवय्यांच्या वारीने दुथडी भरून वाहू लागते.आणि वारी प्रमाणे इथेही निरनिराळे चांगले वाईट अनुभव येतात.कालचा अनुभव अगदी त्यातलाच एक.काल सहकुटुंब सहपरिवार हॉटेल मध्ये गेलो होतो,शेजारच्या टेबल वर एक तिशीतील जोडपे बरोबर एक साधारण दीड ते दोन वर्षाची मुलगी आणि काही इतर मित्रमंडळी जेवत होती. मुलीच्या हातात दोन तीन फुगे एकत्र बांधलेले खेळणे होते. ती तिच्याशी खेळत होती आणि आई वडील मित्रमंडळीशी गप्पा मारत होते.आपल्याकडे कुणी लक्ष देत नाही हे पाहून मुलीने भोकाड पसरले.हातातला फुगा आईच्या चेहऱ्यावर मारू लागली.आईने वैतागून पोरीला बापाकडे दिले.पण त्यालाही पोरीपेक्षा गप्पा आणि खाण्यातच अधिक रस होता.अखेरीस पोरीला कुणी घ्यायचे यावरून त्यांच्यात वाद सुरु झाला.तोच तिथला manager त्यांच्या मदतीला धावला.त्याने मुलीला कडेवर घेतले आणि कोपरयातील फिश tank मधील मासे तिला दाखवू लागला.इकडे आई वडील पुन्हा गप्पामध्ये मशगुल झाले.इकडे manager मात्र आपल्या कस्टमर ला काहीही त्रास होवू नये म्हणून पोरीला अगदी छान खेळवत होता. खेळताना ती फुगा तोंडात तर घालत नाहीये न याची खबरदारी घेत होता.मधेच जसे त्याला इतर टेबल वर ओर्डेर येत होत्या तसा तो एका वेटर ला त्या मुलीला द्यायचा आणि पुन्हा येऊन तिच्या शी खेळायचा. जवळ जवळ अर्धा तास हा सगळा कार्यक्रम चालला.इकडे आई बाबांचं यथेछ्च जेवण झाल्यावर त्यांना त्यांच्या लाडक्या लेकीची आठवण झाली.वडिलांनी अगदी लहान मुलाने आपले खेळणे दुसर्याने घेतल्यावर ओढून घ्यावे. तसे त्या मुलीला ओढून घेतले.आणि thanks तर सोडाच पण किमान हसून देखील त्याने त्याचे आभार मानले नाहीत. पुढे जाताना वारंवार ती मुलगी त्या manegar कडे पाहून वडिलांना खुणावत होती. पण त्यांनी तिच्याकडे तिळभर ही लक्ष दिले नाही आणि तो निघून गेला. Manager चा चेहरा क्षणभर आर्त झाला परंतु त्याने स्वत:ला आवरत तिथून पाय काढला.
का वागतो आपण या लोकांशी असे? ती माणसे नाहीत?त्यांना त्यांच्या भावना, अभिमान नाही? केवळ ते आपली सेवा करतात म्हणून त्यांना वाट्टेल तसे वागवाण्याचा अधिकार आपल्याला आहे का?एका अर्थाने अन्नदाते असलेले हे लोक आणि आपण कसे वागवतो त्यांना ? टेबल साफ करणारी पोरे पहिली कि त्यांच्या प्रमाणे आपल्या घरातील मुले का आठवत नाहीत आपल्याला ? आपण आपल्या घरातील मुलांना एवढे कामा ला लावतो तरी का ? मग या मुलाकडून मोठ्यासारख काम मिळण्याची अपेक्षा का करतो? परिस्थिती माणसाला अशी कामे करण्यास भाग पाडते म्हणून आपण त्यांना अपमानास्पद वागणूक द्यायची हा कुठला न्याय आहे ? जर ही माणसे नसती तर आपल्याला आज काल चे हे SO CALLED LUXURIOUS LIFE कसे मिळाले असते?
नाण्याची आपल्याला सोयीस्कर ती बाजू पहायची सवय झाली आहे आपल्याला. कधी तरी माणसाकडे कुठले ही लेबल न लावता माणूस म्हणून पाहूयात आयुष्य सुंदर आहे ते अधिक सुंदर होईल असे वाटत नाही का? या blog नंतर किमान एका हॉटेल मधल्या वेटर किंवा maneger वा टेबल पुसणाऱ्या मुलाकडे पाहून केवळ छान अंत:करणाने हसलात तरी माझे लिहिण्याचे प्रयोजन कामी आले असे मी समजेन आणि मला खात्री आहे तुम्हे ते नक्की पूर्ण कराल. चला पुन्हा भेट पुढच्या blog मध्ये लहान तोंडी मोठा घास घेतला असे वाटत असेल तर माफ करा.
अधिश