१ जानेवारीला आधल्या रात्रीच्या hangover मधून कसेबसे बाहेर येत आपण सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आपण नवीन वर्षाची सुरवात करतो. आणि अचानक काही दिवसांनी पेपर मधील काही जाहिराती पाहून आपल्याला अचानक साक्षात्कार होतो कि अजून आपले नवीन वर्ष सुरु झालेच नाहीये. या जाहिराती असतात मरठी नूतन वर्ष अर्थात च गुढीपाडव्या निमित्त च्या विविध offers , आणि discount च्या मग आपली लगबग सुरु होते की या वेळेस गुढीपाडव्या ला काय नवीन खरेदी करायची, काय केले म्हणजे नवीन खरेदी मुहूर्तावर घरी येईल, यंदा श्रीखंड साठी चक्क कुठून आणायचा, सणाच्या मागे पुढे जर weekend आला तर काय plan करायचा. एक ना अनेक विचार सुरु होतात. पण या सगळ्यात आपण हा सण का साजरा करतो ? त्यामागे काही सामाजिक, शास्त्रीय, सांस्कृतिक,धार्मिक काही महत्व आहे का? या सगळ्या कडे सपशेल दुर्लक्ष करतो.
रामाच्या पराक्रमाची आणि त्याच्या आयोध्या पुनरागमनाची साक्ष देणारी ही गुढी आपल्याला जीवनाच्या pholosophy चे खूप महत्वाचे धडे अगदी सहज शिकवून जाते. गुढी मध्ये आपण गोड गाठी आणि कडूलीम्बाची पाने एकत्र बांधतो. ज्याने आपल्याला कळते कि आयुष्य ही ह्या गुढी प्रमाणे आहेत ज्याला गोड सुख आणि कडू दुख्ख एकमेकांना बांधले गेले आहेत. सुखा शिवाय दुख्खाला मजा नाही आणि दुख्खा शिवाय सुखाला.
मला लहानपणी पासून एक प्रश्न पडायचा आपल्या मराठी नवीन वर्ष्ची सुरुवात चैत्र महिन्या सारख्या उष्ण आणि कडक उन्हाच्या महिन्यात का होते ? नवीन वर्षाची सुरवात कशी सुखद आणि आल्हाददायक हवी मग श्रावणात च नवीन मराठी नवीन वर्ष सुरु व्हायला हवे. पण आता मोठे झाल्यावर या मागची मराठी मनाची झुंजार अस्मिता माझ्या लक्षात आली. चैत्र महिन्यात सगळी कसे कडक उन्ह असते परंतु याच ऋतूत आजूबाजूच्या सर्व झाडांना नवी चैत्रपालवी फुटते. हीच नवी पालवी पुढे श्रावणात जाऊन बहरते आणि फुलते. पण तिच्या अस्तित्वाचा जन्म मात्र कडक उन्हाशी झुंज देऊन च होतो. अनुकूल परिस्थिती मध्ये तर सगळेच नव्या गोष्टी सुरु करतात प्रतिकूल ते मध्ये जे नवीन जीवन सुरु करतात तेच खरे वीर आणि मराठे. म्हणून या झुन्जाराच्या उत्सवाचा दिवस म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो.
पण आपली आजची पिढी या values आणि phlosophy ला भिक घालत नाही. आपण विज्ञानानी सिद्ध केलेल्या च गोष्टी खऱ्या मानतो. पण आपला हा सण या कसोटीवर ही खरा उतरतो. या दिवशी आपण officially कटू रसाचे अर्थात च कडूलीम्बाची चटणी खातो ज्याने उन्हाळ्यात होणारे अनेक आजारां पासून आपल्याला लढायला शारीरिक ताकद मिळते. तसेच गुढीपाडव्या पासून सुरु होणारी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आपण कैरी चे थंड पन्हे सेवन करतो ज्याने शरीराला आवश्यक थंडावा मिळतो. पूर्वी च्या काळी स्त्रियांना तर या निमित्ताने घरातील उकाड्यापासून सुटका मिळून थंड हवेत फेरफटका मारायची संधी पण मिळायची.
अशा रीतीने विचार केला तर वाटत खरच आपल्या पूर्वजांनी किती विचार करून या साऱ्या सणांची आखणी केली आहे आणि आपण आहोत कि जे हे सण नीट साजरे देखील करत नाही. पण यंदा थोडासा असा विचाराने हा गुढीपाडवा साजरा करूयात. बाकीचे नुसते गुढी उभारतील आपण डोळस दृष्टीकोनाची गुढी उभारुयात.आपल्या सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!